नमस्कार. विठ्ठल विठ्ठल.
मी वैभव निंबाळकर. वय वर्षे २६. कालपरवापर्यंत अगदी सामान्य, नाकासमोरचे आयुष्य जगलेले! बारामतीसारख्या निमशहरात शालेय शिक्षण झालेले. पुढे वडिलांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा श्रीसद्गुरु वामनराव पै यांच्या विचारांमुळे त्यांना आधीच मिळाली असल्याने आम्ही पुण्याला येण्याचा निर्णय घेतला.
बारावीच्या सुट्टीत सद्गुरुंचे 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' आणि 'अंधार अंधश्रद्धेचा' हे दोन ग्रंथ वाचनात आले आणि मी तिथेच जीवनविद्येच्या प्रेमात पडलो! अतिशय वैज्ञानिक, तर्कशुद्ध विवरणातून श्रीसद्गुरुंनी निसर्गनियम, धर्म, पाप-पुण्य, नियति, नशीब, सुख्-दुःख आदींचे दिलेले अनमोल ज्ञान मला प्रचंड भावले! वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाचन केल्याने अंधश्रद्धेला सद्गुरुंनी केलेला विरोध, वास्तववादाचे अधिष्ठान ठेवत प्रयत्नवादाला दिलेले महत्त्व, शुभचिंतन व ईश्वरचिंतन यांचे वैज्ञानिकाच्या दृष्टीने केले विवेचन, कर्मकांडांना विरोध, परमेश्वराची केलेली अप्रतिम व्याख्या, आदी सर्वच मला आवडले, पटले! त्या ज्ञानाने मी अक्षरश: झपाटला गेलो! त्यामुळे त्या सुट्टीतच मी सद्गुगुरुंचे सर्व ग्रंथ वाचून काढले. जीवनविद्येच्या कार्यात यथाशक्ती सहभाग घेऊ लागलो. त्यातून व्यक्तिमत्व विकास आपोआप होत गेला.
सद्गुरुंच्या ग्रंथांमुळेच मला टॉपला जाण्याची प्रेरणा मिळाली. आधीची नकारात्मक, आत्मकेन्द्री विचारसरणी गळून पडली. त्याजागी सकारात्मक, उच्च विचारसरणी आली. जीवनविद्येच्या दिव्य विचारांनुसार 'हे जग सुखी व्हावे' आणि 'आपले हिन्दुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने, सर्व राष्ट्रांच्या पुढे पुढे जावे' या संकल्पांच्या अधिष्ठानावरच आपल्याही करिअरची बांधणी करायची असे ठरवले. त्याचदरम्यान 'मालाड' येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सद्गुरु म्हणाले की 'आपल्या मुलांनी टॉपला गेले पाहिजे. कुठलीही छोटीशी नोकरी शोधत बसण्यापेक्षा IAS, IPS किंवा उद्योजक झाले पाहिजे!' आणि अगदी त्यानंतरच मी बसलो होतो तिथे पहिल्या रांगेकडे पाहत सद्गुरु म्हणाले, "मला या इथेच अशी मुले दिसताहेत की जे नक्की IAS, IPS होऊ शकतात!" बस्स! तिथेच मनाने उचल खाल्ली! सद्गुरुंच्या मार्गदर्शनानुसार IAS
होण्याचे ध्येय निश्चित झाले!
पुढे B.Sc.च्या पहिल्या वर्षाला असताना सद्गुरुकृपेने जीवनविद्या मिशनच्या अभिनव कोर्सेस 'स्वानंदयोग भाग १' मध्ये 'निसर्गनियम' या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. त्यातून जीवनविद्येचा अभ्यास तर वाढलाच, पण त्याबरोबरच आत्मविश्वासही दुणावला. तिथे शंभरेक लोकांसमोर जीवनविद्या मांडण्याचा झालेला सराव मला UPSCच्या मुलाखतीवेळी उपयोगी पडला! ('Learning & practising Jeevanvidya Philosophy' ही माझी आवड मी मुलाखतीच्या Bio-data मध्ये लिहिली होती.)
आपण एक पाऊल पुढे टाकायचा अवकाश की सद्गुरु आपल्याला दहा पाऊले पुढे नेऊन ठेवतात याची प्रचीती मला लवकरच आली. त्याद्वारे 'हे लक्ष्य गाठावे ही तो श्रींची इच्छा' असे दिव्य अधिष्ठान सद्गुरुंनी मिळवून दिले. आता फक्त ध्येयप्रप्तिच्या दिशेने प्रयत्न करणे बाकी होते!
UPSC च्या पुढील मार्गदर्शनासाठी दिल्लीला जायचे ठरले. सोबत सद्गुरुंचे ज्ञान आणि आशीर्वाद असल्याने मनात कसलीही भीती वा शंका नव्हती! जीवनविद्येनुसार केलेल्या आचरणामुळे दिल्लीतही सहाध्यायींची मने त्वरीत जिंकता आली! रूमपार्टनरने माझ्या आई-वडिलांसमोर माझ्याबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया त्याचेच एक उदाहरण! तो म्हणाला की, "अंकल-आंटी, आप बतौर व्यक्ती कैसे हो मुझे पता नही, पर बतौर पॅरेंट आप बहोत कामयाब हो! मैं ७-८ सालसे बाहर होस्टलपें रहा हूl बहोत रूमपार्टनर देखेl पर आपके बेटे जैसा कोई जिंदगीमें नही देखा! इस लडकेको अगर आप किसी गंदी जगहपर भी भेजोगे, तो वह जगह साफ होगी, पर यह लडका कभी गंदा नही होगा!" त्याक्षणीसुद्धा मला आई-वडिलांच्या चेह-यावर झळकणारे समाधान दिसले... आणि हे ज्या सद्गुरुंमुळे, त्यांच्या ज्ञानामुळे घडले त्यांप्रती कृतज्ञता दाटून आली!
दुसरीकडे परीक्षा जसजशी जवळ येत होती तसतसा अभ्यासाचा ताणही वाढत होता. पण जीवनविद्येच्या मार्गदर्शनामुळे Stress management शिकलो होतोच आणि मी अक्षरश: अभ्यास Enjoy करत होतो! जीवनविद्येच्या ग्रंथांनी शिकवलेली बहिर्मन-अंतर्मनाची युक्ति आणि Visualisation Techniqueचा वापर करून अभ्यास करू लागलो. पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार हा विश्वास मनात होता. त्या विचाराला विश्वप्रार्थनेची, Positive विचारांची जोड देत होतोच. त्याचबरोबर, 'Love work honestly, bless all sincerely & you'll be blessed by God according to Laws of Nature' हा माझा आवडता, सद्गुरु वामनराव पै यांनी मांडलेला सिद्धांत मनापासून आचरण्याचा प्रयत्न करत होतो!
UPSCची परीक्षा संपूर्ण वर्षभर तीन टप्प्यांत होते. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला सद्गुरुन्चे मार्गदर्शन लाभले! प्रत्येक टप्पा अगदी सहज पार करत गेलो ते सद्गुरुंच्या कडेवर बसूनच! अगदी मुख्य परीक्षेदरम्यान कावीळ होऊनही मी अजिबात डगमगलो नाही याचे कारण 'सद्गुरुसारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी?' ही दुर्दम्य आत्मश्रद्धा! अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यासाठी दिल्लीला जाण्याअगोदर सद्गुरुंना भेटलो तेव्हा सद्गुरुंनी भरभरून आशीर्वाद तर दिलेच पण जीवनविद्येवरील संभाव्य प्रश्नोत्तरांची तयारीही करवून घेतली! शिवाय त्यांच्या स्वतःच्या मुलाखतीचे किस्से सांगून मला मोकळे अन् निवांत केले! शिष्यांच्या भल्यासाठीची केवढी ही तळमळ! दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीचा ताण तर केव्हाच निघून गेला होता! आता तर लक्ष्य अगदी स्पष्ट समोर दिसत होते!
अगदी त्याच दिवशी घडलेली एक गोष्ट सांगण्याचा इथे मोह होतो! मला अभिरूप मुलाखतीदरम्यान कमीत कमी हातवारे करण्याचा आणि जरा कमीच हास्य ठेवण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता; तर काहींनी त्याउलट करण्याचा! अशा विरुद्ध मतांमुळे मी संभ्रमात होतो! सद्गुरुंच्या घरी गेलो असता सद्गुरुंनी तो विषयच निकालात काढला! त्यांनी मला विचारले की, तू 'निसर्गनियम' विषय शिकवताना कसे हातवारे करतोस? तसेच अगदी 'नैसर्गिक' हातवारे आणि हास्य ठेव! काय हे मार्गदर्शन! त्या उत्तराने तर मी अजूनच निश्चिंत झालो! पुन्हा त्या दिवशी रात्री दिल्लीला पोहोचल्यानंतर, दुस-या दिवशीच्या मुलाखतीसाठी सद्गुरुंचे पुनश्च आशीर्वाद घेण्यासाठी म्हणुन फोन केला, तर काय आश्चर्य? फोनवर सद्गुरुच बोलत होते आणि त्यांचं पहिलंच वाक्य होतं की "अरे, बरं झालं फोन केलास. मी तुझ्याच फोनची वाट पाहत होतो!" क्षणभर मी उडालोच! पुढे सद्गुरु म्हणाले, "तिथे मुलाखतीच्या पॅनेलवर बसलेले सर्व मोठे आणि अनुभवी असतात, तेव्हा तू जरा अगदीच जास्त हास्य ठेवलेस तर त्यांना आवडणार नाही! तर तू फक्त स्मित करत राहा!" काय ही आर्तता! आपल्या शिष्यांसाठी, सर्वांच्या भल्यासाठी अहर्निश झटणारे, आपला देह अक्षरशः चंदनासारखा झिजवणारे हे सद्गुरु किती महान! आणि शिष्य म्हणून आपणही काय भाग्यवान! सगळंच अद्भुत् अन् दिव्य!
अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावर मला सद्गुरु मार्गदर्शन करीत राहिले; विश्वप्रार्थना, साधनेतून भेटत राहिले; प्रयत्नांचे बळ वाढवित राहिले! आज मागे वळून पाहताना हे सारे मला एकट्याला जमणे शक्यच नव्हते असे न राहवून वाटत राहते! घेतलेल्या सर्व कष्टांचे चीज झाले खरे पण त्यासाठी अगणित जणांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच हा 'सोनियाचा दिनु' पाहता आला! 'तया ऐलीच थडी सरले मायाजळ' असाच काहीसा अनुभव मीही घेत आहे! कुटुंबात आई-वडीलांनी मानसिक, भावनिक, शारीरिक आधार दिला; बहीणीने वेळोवेळी मोलाच्या चार टिप्स दिल्या. सर्व शिक्षकांनी उत्तम ज्ञान दिले, मार्गदर्शन केले. आत्मदेवाचे अधिष्ठान लाभले; म्हणूनच हे जीवनही लाभले. त्या ईश्वराच्या स्मरणात हे यश मिळवू शकलो हे माझे भाग्यच! आणि त्या स्मरणाची गुरुकिल्ली सद्गुरुंनी दिली हे तर परमभाग्य! असंख्य नामधारकांच्या ('जीवनविद्या मिशन'चे साधक) शुभेच्छा, visualisations अन् आशीर्वाद यांचे पाठबळ या संपूर्ण प्रवासात मला लाभले! हा सगळा नामधारकांचा परिवार ज्यानी जोडून दिला त्या सद्गुरुंचे श्रेय किती महान! या यशाद्वारे सद्गुरुंना काहीअंशी का होईना पण गुरुदक्षिणा देऊ शकलो याचा मला अधिक आनंद आहे! सद्गुरुंना तसे बोलून दाखविल्यानंतर सद्गुरु म्हणाले, "ही तर सुरुवात आहे! तू अजून खूप देणार आहेस!" धन्य ते सद्गुरु!
खरंच! ही तर केवळ सुरुवात आहे! हे यश या राष्ट्राच्या उत्कर्ष व उन्नतीसाठी आणि हे जग सुखी करण्यासाठी वापरायचे आहे हा सद्गुरुंचा संकल्प मी मनात बाळगून आहे. 'कार्यकर्ता अधिकारी' म्हणून प्रशासनात जाऊन आपण सुखी झालो तसे इतरांनाही सुखी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहीन! त्यासाठी सर्वांच्या शुभेच्छांची मला यापुढेही अशीच गरज आहे!
-
Vaibhav Nimbalkar, I.P.S.,
Sub-Divisional Police Officer, Bokakhat (Kaziranga),
Assam.
Sir apla anubhav wachun khup chaan watle.
ReplyDelete"Tuch ahes tujya Jivnacha Shilpkar" pustak me wachley khup anmol margdarshan keley guruni tyat.
Ani aplyala ek chotishi vinanti ahe ki apan amhala asech aple vichar ani margdarshan niyamit ghadu dya,police service mdhe astana khup kathin ahe hey, pan tumhala ani tumchyasarkhya adhikari zalelyankdun je vichar vyakt kele jatat tyatun mala ani majyasarkhya hazarona Jivnat kahitari krun dakhvnyachi prerana milte.
apan sanvad sadhnyasathi ajun ek marg uplabhdh krun dilyabaddal dhanywad.
Swapnil M. Shinde
Pharach apratim! Very inspiring! Aksharshaha bharavun gelo! Thanks for sharing.
ReplyDeleteThe way you have revealed Jeevanvidya philosophy in min. words is just amazing !Indeed inspiring...
ReplyDeleteWhen i read it i was happy that you had a supportive family and met people who changed ur life for the good.Also the philosophy you practice is orientated towards making this world a better place to live which is what i liked the most.god be with you through your efforts.we are also with you in this journey.my best wishes and i look forward to more writing from you on your perspective on life in general and your experiences in the ips.
ReplyDeletemanat changala bhav asala ki apoap apali pawale yogya dishene padatat, sarakhya vicharanchya lokanchi bhet hote ani bhakkam pathabal milate je ayushyatil pratyek kshanal samore janyachi shakti dete. tumhi far sundar shabtat tumache anubhav share kelet. nischitpane te amhalahi ayushyachya pravasat molachi saath detil. thanx a lot...n keep inspiring.
ReplyDeleteawesome life story
ReplyDelete